Kharip Pik Vima 2021-22 | पीक विमा जमा होण्यास सुरुवात | 40 कोटीचा अग्रीम पीक विमा मंजूर

आपले स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तरी या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना चाळीस कोटीचा अग्रीम पिक विमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्या रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना मोठा हा दिलासा मिळालेला आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेतील मध्यम आतील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यात आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आलेला होता ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता.

पीक विमा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सहा सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीने प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानी संदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या मंडळातील मागील सात वर्षातील सरासरी उत्पादनेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार आयसीआयसीआय लोबर्ट जनरल इन्शुरन्स कंपनीने यासाठी मंजूर रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा हात दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे पिक विमा संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा

पीक विमा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment