मोफत गॅस योजना या कुटुंबांना मिळणार वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत पात्रता अटी कागदपत्रे पहा mofat gas yojana

mofat gas yojana राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यात आला आणि या अर्थसंकल्पात अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या त्यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (मोफत गॅस योजना) होय मित्रांनो या योजनेमधून आता शासनातर्फे तीन घरगुती वापराचे गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जाणार आहे.

मोफत गॅस योजना यादीत
नाव पहा 

मित्रांनो घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असल्याकारणाने या योजनेचा फायदा हा नक्कीच अनेक कुटुंबांना होणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता कोणती असणार आहे तसेच या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत पाहूया. या योजनेमधून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. म्हणजेच काय तर एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. त्यानंतरचे गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र आहे त्या किमतीमध्ये खरेदी करावे लागतील.

बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न पडला असेल की आमच्याकडे गॅसचे दोन कनेक्शन आहे घरातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तर मग आम्हाला सहा गॅस सिलेंडर मोफत मिळतील का ? तर मित्रांनो याचे उत्तर आहे नाही मित्रांनो एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील, तुमच्याकडे कितीही गॅस कनेक्शन असो त्याचा काही या ठिकाणी फायदा होणार नाही मित्रांनो कुटुंबाची व्याख्या कशी पकडणार तर राशन कार्ड वर नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब पकडण्यात येईल.

मित्रांनो या योजनेमधून गॅस सिलेंडर मोफत जरी मिळणार असले तरी सुरुवातीला ते पैसे देऊनच खरेदी करावे लागतील. नंतर या योजनेची पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलेच्या बँक खात्यात वर्षानं तीन सिलेंडरचे पैसे शासनाकडून जमा केले जातील मित्रांनो आता या योजनेच्या संदर्भामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना दिल्या जाणार आहे का ?

तर याचे उत्तर आहे नाही या योजने करिता शासनाकडून एक अट ठेवण्यात आलेली आहे त्या अटीनुसार पिवळे तसेच केशरी रेशन कार्ड धारक जे कुटुंब आहे त्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ हा दिल्या जाणार आहे पांढरे रेशन कार्डधारक जे कुटुंब असेल त्यांना या योजनेचा लाभ हा दिल्या जाणार नाही. मित्रांनो या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच जीआर अद्याप प्रकाशित झालेला नाही. जीआर प्रकाशित झाल्यानंतर या योजनेच्या सविस्तर पात्रतेबाबत तसेच कागदपत्र बाबत व लाभ घेण्याकरिता करावयाच्या अर्जाबाबत अपडेट पाहायला मिळेल.

Leave a Comment