10 वी चा निकाल आज होणार जाहीर | 2022 Maharashtra SSC Result 2022 Live | असा पहा निकाल मोबाईलवर

Maharashtra SSC Result 2022 Live: SSC will announce SSC or Class 10 result on June 17, 2022 at 1 pm : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर होईल. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

  1. http://www.mahresult.nic.in/
  2. sscresult.mkcl.org
  3. https://ssc.mahresults.org.in/

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

 

2 thoughts on “10 वी चा निकाल आज होणार जाहीर | 2022 Maharashtra SSC Result 2022 Live | असा पहा निकाल मोबाईलवर”

Leave a Comment