तालुका निहाय पिक विमा रक्कम जाहीर लाभार्थी यादीत नाव पहा pik vima list 2024 pdf

 

pik vima list 2024 pdf प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील विविध महत्त्वाच्या पिकांचे विमा संरक्षण व विमा हप्ता जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा काढता येणार आहे. तांदळासाठी हेक्टरी सर्वाधिक ५१ हजार ७६० रुपये विमा संरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्याखालोखाल सोयाबीनला हेक्टरी ४९ हजार रुपये दर मिळाला आहे.

 


तालुका निहाय यादी पहा

 

चालू खरीप हंगामात केवळ एक रुपया भरून पीक विम्याचा लाभ देण्यासाठी ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत केंद्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार खरीप हंगाम २०२३-२४ ते रब्बी हंगाम २०२५-२६ साठी ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ (कप व कॅप मॉडेल ८०:११०) राबविण्यास राज्य शासनाने २६ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे.

 

नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग अशा अनाकलनीय प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखणे. नाविन्यपूर्ण व सुधारित लागवड तंत्रज्ञान व साहित्याच्या वापरास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या कर्जात सातत्य राखणे, जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पादन जोखमीपासून संरक्षण मिळू शकेल, अन्नसुरक्षा पिकांचे वैविध्य आणि कृषी क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

ही योजना केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुटुंबाने किंवा भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम पातळी निश्चित करण्यात आली आहे.

 

Leave a Comment