या तारखे पर्यंत लागणार दहावीचा निकाल दीपक केसरकरांनी दिली मोठी अपडेट SSC Result 2024 Maharashtra Board mahresult.nic.in

SSC Result 2024 Maharashtra Board महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली. बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र एसएससी निकालाची तारीख कधी जाहीर केली जाईल याची माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली. दहावीचा निकाल २७ मेपर्यंत जाहीर होणार आहे.

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

दहावीचा निकाल २७ मेपर्यंत जाहीर होईल, असे केसरकर यांनी सांगितले. अकरावीची प्रवेश प्रक्रिया २४ तारखेपासून सुरू होणार आहे. केसरकर म्हणाले की, राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आहे, तर इतर शहरांमध्ये ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया आहे.  बारावीचा निकाल आठ दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. दोन दिवसांपूर्वी निकाल जाहीर होणार होता. मात्र, राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान अद्याप बाकी आहे. राज्यात निवडणुका झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसायचे आहे, ते बसू शकतात.

Leave a Comment