PM Kisan 16th installments :शेतकऱ्यांच्या पीएम किसानच्या बँक खात्यात 6000 ऐवजी 8000 हजार रुपये जमा

PM किसान 16 वा हप्ता : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी सन्मान निधीच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करू शकते. सध्या एका शेतकरी कुटुंबाला सरकारकडून वर्षाला सुमारे 6 हजार रुपये मिळतात, मात्र आता केंद्र सरकार या राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांऐवजी 8 हजार रुपये देण्याची तयारी करत असल्याचे चित्र आहे.

पीएम किसानच्या लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सरकारच्या या निर्णयाचा सुमारे साडेआठ कोटी कुटुंबांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणला जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू झाली तरी केंद्र सरकार मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर करून निवडणुकीनंतर निर्णय जाहीर करू शकते.

11 कोटी लोकांना मिळत होती रक्कम-

केंद्र सरकारकडून शेतकरी सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 पासून लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी सुमारे 6 हजार रुपये मिळतात. 2020-21 मध्ये 10 कोटी, तर 2021-22 मध्ये केंद्र सरकारकडून सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये वर्ग करण्यात आले.

Leave a Comment