या शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर | भू-विकास बँकेची सरसकट कर्जमाफी जाहीर | जिल्हा भूविकास बँक bhuvikas karjmafi 2022

bhuvikas karjmafi 2022 महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई (शिखर भूविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे (जिल्हा भूविकास बँका) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणे तसेच या बँकांच्या मालमत्ता शासनाकडे हस्तांतरीत करुन घेण्याबाबत. MJPSKY

प्रस्तावना:

 shetkari karjmafi 2022 महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई (शिखर भुविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे कामकाज अनेक वर्षापासून ठप्प असल्यामुळे या बँकांबाबत अभ्यास करुन शासनास शिफारस करण्यासाठी दि. १७/१२/२०१४ च्या शासन निर्णयान्वये मा. मंत्री (वित्त, नियोजन व वने) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती. shinde sarkar karjmafi मा. मंत्री (वित्त, नियोजन व वने) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीने शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने मा. मंत्रीमंडळाच्या मान्यतेने शासनाने दि. २४.०७.२०१५ च्या शा. नि. अन्वये महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांबाबत धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. 

पूर्ण GR  शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सदर बोजा नोंदीमुळे संबंधीतांना त्यांच्या जमिनींची विक्री करता येत नाही अथवा राष्ट्रीयकृत बँका, जि.म.स. बँका अथवा तत्सम पतसंरचनेमधून शेतीसाठी कर्जदेखील उपलब्ध होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमुळे कर्जदार शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तसेच भूविकास बँकांची कर्ज वसूलीदेखील नगण्य स्वरुपाची असल्याने शासन निर्णयानुसार कर्ज वसूलीतून कर्मचाऱ्यांची देणीसुद्धा देता येत नाहीत. त्यामुळे हक्काची देणी न मिळाल्याने कर्मचारी देखील अडचणीत आहेत. सदर वस्तुस्थिती विचारात घेता, भूविकास बँकांच्या थकबाकीदार कर्जदारांची कर्जमाफी करणे, बँकांच्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी आणि बँकांच्या मालमत्तांबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

कर्जमाफी यादीत नाव पाहणायसाठी येथे क्लिक करा 

शासन निर्णय:

महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई (शिखर भूविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांबाबत खालील प्रमाणे निर्णय घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Comment