Nokia Smartphone : नोकिया बाजारा मध्ये परत धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा 5G Smartphone असणार आहे. तो एकदम तगडा असणार आहे. या मोबाईलमध्ये मोठा बॅटरी बॅकअप असून त्याचा लूक सुद्धा एकदम चांगला आहे. याचे काही फीचर्स लीक झाले आहेत.
Nokia चा हा Smartphone 2022 च्या उत्तरार्धात बाजारा मध्ये दाखल होणार आहे. Nokia X त्याच बरोबर G सीरीज 5G स्मार्टफोन लॉन्च केले जाणार अशी बातमी हाती आली होती. आता, Nokia X30 5G त्याच प्रमाणे Nokia G80 5G चे फीचर्स लीक झाले आहेत.
Nokia G80 5G
लीक शिवाय Nokia G80 5G अर्थात Nokia Apollo सुद्धा FCC प्रमाणपत्रा मध्ये अलीकडेच समोर आला आहे. FCC प्रमाणपत्राने TA-1479, TA-1481, TA-1490, TA-1475 ची Nokia G80 5G चा प्रकार म्हणून पुष्टी केली गेली आहे.
Nokia G80 5G Specifications
FCC सर्टिफिकेशनमधील लेबलने सूचित केल्याप्रमाणे, Nokia G80 5G मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा असू शकतो. Nokia G21 वर उपयोग केलेले एक नवीन कॅमेरा मॉड्यूल असू शकते त्याच बरोबर ते एक चांगले असेल असे सांगण्यात येत आहे. TA-1490 तसेच TA-1475 हे सिंगल-सिमचा मोबाईल आहे. तर TA-1479 तसेच TA-1481 हे ड्युअल-सिम प्रकारा मध्ये मोबाईल उपलब्ध असणार आहे.
Nokia G80 5G बॅटरी
Nokia G80 5G मध्ये 4500mAh बॅटरी असेल. Nokia Mobiles मधील इतर आगामी 5G स्मार्टफोन Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसरवर आधारित आहे. खरं तर, एचएमडी ग्लोबलने प्रेस रिलीजमध्ये त्याच्या भविष्या मधील स्मार्टफोनसाठी क्वालकॉमचा विचार केला जात असल्याचे म्हटले आहे.