ई-श्रम कार्ड registration online 2022 | E-Shram Portal Online Registration

ई श्रम कार्ड योजना या ऑगस्ट २०२१ मध्ये देशात ही योजना भारत सरकारने सन 2021 ला सुरू केलेली आहे. ई श्रम कार्ड योजना हि देशातील सर्वात महत्वपूर्ण योजना आहे. जिची सप्टेंबर २०२१ रोजी घोषणा केली गेली होती. या योजनेअंतर्गत देशातील विविध काम करणाऱ्या नागरिकांना त्याच्या कामानुसार विविध सरकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये लेखामध्ये आपण ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत लाभ घेता येणाऱ्या योजना, तसेच या योजनेसाठी ई श्रम पोर्टल रजिस्ट्रेशन प्रक्रिया काय आहे, ई श्रम कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे कोणती, Free ई श्रमिक कार्ड, लाभार्थी पात्रता काय, ई श्रम कार्ड (Benefits) कशासाठी उपयुक्त आहे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. तुम्ही ई श्रम कार्ड मोफत कोणत्याही फी शिवाय घरबसल्या मिळवू शकता त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

ई श्रम योजना 2022 :

आजपर्यंत १.५ कोटी नागरिकांनी ई श्रम कार्डसाठी रजिस्टर करून त्यांचे ई श्रम कार्ड बनवून घेतले आहे. ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत देशातील असंघटित क्षेत्रातील २७ लाखांहून अधिक कामगारांसाठी ई श्रम पोर्टल वर नोंदणी सुरू केलेली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयामार्फत असंघटित क्षेत्रात कामगारांची नोंदणी करण्यासाठी विविध शिबिरं आयोजित करत आहे. असच एक शिबिर ९ सप्टेंबर २०२१ रोजी श्रम शक्ती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित केले होते. या शिबिरामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यात आली. या कामगारांमध्ये शेतमजूर, लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, CSC केंद्र चालक, आशा कार्यकर्ता, मनरेगा कामगार, भाजी आणि फळ विक्रेता, वृत्तपत्र विक्रेता, नावी, लेदर कामगार, घरगुती कामगार, सुतार, इमारत आणि बांधकाम कामगार, सुईनी, लेबलिंग आणि पॅकेजिंग कामगार, कोळी इत्यादी देशातील नागरिक ई श्रम कार्ड बनवून देशातील विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.

ई श्रम योजना ही देशातील १८ वयोगटापासून पुढील सर्व नागरिकांसाठी उपयुक्त अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी करून बनवून घेतल्याने देशातील विविध नागरिकांना देशातल्या राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे

नोंदणी केलेल्या कामगारांना मिळणारे लाभ (श्रमिक कार्ड फायदे) कोणते?

 •         ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना भारत सरकार मार्फत विमा संरक्षण दिले जाईल.
 •         ई श्रम पोर्टल वर नोंदणीकृत कामगाराचा अपघातात मृत्यू झाला, तर त्याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल.
 •         नोंदणीकृत कामगाराला अपघातामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आले, तर त्याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण प्रदान केले जाईल.
 •         जर ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगाराचा आंशिक अपंगत्व आल्यास रुपये १ लाख रुपये देण्याची तरतूद निश्चित करण्यात आलेली आहे.

ई श्रम पोर्टल 2022

ई श्रम पोर्टल असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारने सुरू केले आहे. या पोर्टल मार्फत असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. यासाठी भारत सरकारने ४०४ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. ई श्रम पोर्टल वर कामगारांची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. मोफत नोंदणी प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे कामगार ई श्रम पोर्टल द्वारे किंवा ॲप द्वारे स्वताची नोंदणी करू शकतात तसेच या कामगारांना सीएससी केंद्राची मदत देखील मिळू शकते याद्वारे ३८ कोटी असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ई श्रम कार्ड दिले जाईल ज्यामध्ये बारा अंकी युनिक क्रमांक असेल हा नंबर देशभरात वैध असेल.

श्रम पोर्टल चे उद्दिष्ट काय ?

ई श्रम पोर्टल से मुख्य उद्दिष्ट हे सर्व संघटित क्षेत्रातील कामगारांचा म्हणजेच स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार, रिक्षा , टमटम, विक्रेते, कृषि कामगार, घरगुती कामगार यांचा डेटाबेस तयार करणे. अशा कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी करून सुरक्षा प्रदान करणे तसेच या पोर्टलच्या माध्यमातून कामगारांच्या कौशल्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे हे आहे.

ई श्रम कार्ड माहिती :

 •         देशात ई श्रम कार्ड बनवण्याचे काम २६ ऑगस्ट २०२१ पासून सुरू केले आहे.
 •         देशातील कोणत्याही राज्यातील नागरिक हे कार्ड बनवू शकतो.
 •         या कार्ड मार्फत कामगारांचा सरकारकडे डेटाबेस उपलब्ध होईल.
 •         श्रम आणि रोजगार मंत्रालय हा डेटाबेस तयार करेल.
 •         हे कार्ड बनवण्यासाठी देशातील कामगार नागरिकांना कार्ड अधिकृत वेबसाईटवर जाऊन  नोंदणी करावी लागेल.
 •         नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक कामगाराला एक विशिष्ट ओळखपत्र दिले जाईल.
 •         असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार कार्ड बनवण्यास पात्र असतील.
 •         या कार्डद्वारे देशातील सर्व नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल. .
 •         या योजनेद्वारे प्राप्त झालेल्या डेटाबेस नुसार देशातील विविध नागरिकांसाठी सरकारी योजना चालवल्या जातील.
 •         या कार्डामार्फत नोंदणीकृत नागरिकांना पीएम सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल.
 •         तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात झाला, तर नोंदणीकृत कामगारांना २ लाखापर्यंत विमा दिला जाईल. परंतु त्या नागरी काकडे ई श्रम कार्ड असणे आवश्यक आहे.
 •         या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रीमियमची रक्कम देखील भारत सरकार भरणार आहे. 

ई श्रम महत्वाच्या लिंक्स

श्रम पोर्टल मध्ये कोणाचा हातभार असेल?

 •         लाईन सरकार किंवा केंद्र सरकारचा विभाग
 •         राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र
 •         कामगार आणि रोजगार मंत्रालय
 •         एन पी सी आय
 •         असंघटित कामगार आणि त्यांचे कुटुंब
 •         सीएससी – एस पी व्ही
 •         UPDIA
 •         EPFO
 •         ESIC
 •         इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
 •         खाजगी क्षेत्रातील भागीदार
 •         पोस्ट ऑफिस द्वारे पोस्ट विभाग

श्रम कार्डाचे लाभार्थी कोण?

 •         लहान आणि अल्पभूधारक शेतकरी
 •         शेतमजूर
 •         CSC केंद्र चालक
 •         आशा कार्यकर्ता
 •         मनरेगा कामगार
 •         भाजी आणि फळ विक्रेता
 •         वृत्तपत्र विक्रेता
 •         न्हावी
 •         लेदर कामगार
 •         घरगुती कामगार
 •         सुतार
 •         इमारत आणि बांधकाम कामगार
 •         सुईनी
 •         लेबलिंग आणि पॅकेजिंग कामगार
 •         कोळी

श्रम पोर्टल वर रजिस्ट्रेशन कसे करावे?

 •         सर्वप्रथम तुम्हाला ई श्रम च्या अधिकृत वेबसाईट https://eshram.gov.in/ वर जावे लागेल.
 •         यानंतर मुखपृष्ठावर तुम्हाला ई श्रम नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 •         यावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर दुसरे पृष्ठ उघडेल.
 •         या पृष्ठावर तुम्हाला तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर, कॅपटचा कोड, ई पी एफ ओ आणि ईएसआयसी सदस्य स्थिती भरावी लागेल.
 •         ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवा (सेंड ओटीपी) या बटनावर क्लिक करावे लागेल.
 •         यानंतर तुमचा मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी ओटीपी बॉक्समध्ये भरावा लागेल आणि खाली रजिस्टर पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 •         अशा प्रकारे तुमची ई श्रम पोर्टल वर नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण होईल.

ई श्रम कार्ड 2022 ऑनलाईन कसे मिळवायचे?

 •         सर्वप्रथम तुम्हाला ई श्रम पोर्टल वर जावे लागेल.
 •         त्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठाच्या उजव्या दिशेला Register on e- Shram असा एक पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
 •         त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल, या फॉर्ममध्ये तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे तो मोबाईल नंबर पहिल्या बॉक्स मध्ये भरायचा आहे.
 •         त्यानंतर Captcha Code भरायचा आहे.
 •         आता तुम्हाला EPFO आणि ESIC सदस्य स्थिती प्रविष्ट करावी लागेल .
 •         यानंतर तुम्हाला Send OTP या बटनावर क्लिक करावे लागेल. तुमच्या आधार कार्ड संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर तुमचा ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला ओटीपी बॉक्स मध्ये भरावा लागेल.
 •         यानंतर तुम्हाला Submit बटणावर क्लिक करावे लागेल.
 •         यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल आणि Submit बटणावर क्लिक करावे लागेल.
 •         यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी तुम्हाला ओटीपी बॉक्समध्ये भरावा लागेल आणि Validate या बटनावर क्लिक करावे लागेल.
 •         आता तुमचा आधार कार्ड चा डेटाबेस मधील तुमचा फोटो आणि आधार कार्ड वरील माहिती स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
 •         यानंतर तुम्हाला तपशील प्रविष्ट करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 •         यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय आणि कौशल्य, बँक तपशील याबरोबरच आवश्यक ती वेळोवेळी विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 •         ही सर्व माहिती भरुन झाल्यानंतर प्रीव्ह्यू सेल्फ डिक्लेरेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 •         आता तुमच्या समोर तुम्ही भरलेली सर्व माहिती तुमच्या पुढे स्क्रीन मध्ये दिसेल.
 •         यानंतर खाली तुम्हाला घोषणेनेवरती टिक बॉक्समध्ये टिक करावी लागेल आणि Confirm या बटनावर क्लिक करावे लागेल.
 •         यानंतर तुमच्या पुढे तुमचे ई श्रम कार्ड उघडेल डाव्या साईडला तुम्हाला UAN Card असा एक पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करून तुमचे ई श्रम कार्ड मिळवायचे आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमचे श्रम कार्ड यशस्वीरित्या प्राप्त करता येईल.

Leave a Comment