जिल्हा न्यायालय मध्ये पर्मनंट भरती पगार 15000 ते 47000 हजार पात्रता आजच अर्ज करा

District Court Recruitment 2024 लातूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील “सफाईगार” या पदाकरीता १० (दहा) उमेदवारांची निवडसूची आणि ०३ (तीन) उमेदवारांची प्रतिक्षासूची तयार करण्यासाठी, वेतनश्रेणी एस – १ रु. १५००० – ४७६००/– अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतनश्रेणीत पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

सफाईगार जाहिरात पहा 

 

सफाईगार या पदाकरीता अर्ज करा 

 

पात्र उमेदारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्राच्या स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत पोच देय डाकेने / पत्रा द्वारे म्हणजेच RPAD किंवा शिघ्र डाक सेवा पोच पावतीसह म्हणजेच Speed Post द्वारे या कार्यालयास पाठवावेत. तसेच लिफाफ्यावर सफाईगार या पदासाठी अर्ज असे नमुद करावे. कोणत्याही परिस्थितीत हस्तप्रेक्षणाद्वारे म्हणजेच “By Hand” अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अपूर्ण अर्ज नामंजूर करण्यात येतील याचीही नोंद घ्यावी. तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याचीही नोंद घ्यावी. अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख १४/०५/२०२४ सायंकाळी ६:०० पर्यंत आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

वयोमर्यादा :

  • अ) जाहिरात प्रसिध्दीच्या दिवशी शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय १८ वर्षापेक्षा कमी आणि ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • ब) योग्य मार्गाने अर्ज करणा-या राज्य / केंद्र सरकारी कर्मचा-याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.

कामाचे स्वरूप: 

  • अ) निवड झालेल्या उमेदवारांची, जेथे नियुक्ती केली जाईल, तेथील न्यायालय इमारतीची इमारतीच्या परिसराची निवासस्थानाची व कार्यालयांच्या प्रसाधनगृहांची नियमीत स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे. 
  • ब) न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे. 
  • क) वरील अ आणि मध्ये नमुद केलेल्या कामाव्यतिरीक्त  न्यायिक अधिकारी आणि न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करणे

वेतनश्रेणी : सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस-१ रु१५०००-४७६००/- अधिक नियमानुसार देय भत्ते

 

Leave a Comment