पिक विम्यासाठी 62 कोटी 93 लाख मंजूर | pik vima 2022 | crop insurance | pik vima yadi

crop insurance प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे. अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रु.१०००/- पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रु.१०००/ अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्र. (१) अन्वये निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्र.२ च्या परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अवलंबावयाची कार्यपध्दती आणि अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या आहेत. कृषि आयुक्तालयाच्या संदर्भ क्र. (७) च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार “प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान” योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२१-२२ करीता रु.६२,९७,८९५/- इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पीक विमा यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लीक करा 

शासन निर्णय :- “प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान” या योजनेअंतर्गत कृषि आयुक्तालयाने संदर्भ क्र.७ येथील दि.१७.०१.२०२३ च्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२१-२२ करीता स्तंभ क्र. ६ मध्ये एकूण रु.६२,९७,८९५/- इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Comment