राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप | ६/४/२ संकरित दुधाळ गाई /म्हशी चे वाटप योजना २०२२

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेसंदर्भात या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेची कार्यप्रद्धती, कोणत्या जिल्ह्यांसाठी हि योजना राबवली जाणार आहे, शासन निर्णय, या योजनेसाठी प्रकल्प किंमत, लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टींची माहिती या लेखात तुम्हाला आज मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत महिला बचत गट, अल्पभूधारक शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना या योजनेत चा प्राधान्याने लाभ घेण्यात येणार आहे घेता येणार आहे. ही योजना राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत संकरित आणि देशी गाई यांचे वाटप करण्यात येणार आहे.

संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी

टीप : सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम

 •         महिला बचत गट
 •         अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
 •         सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

 •         फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
 •         सातबारा (अनिवार्य)
 •         ८ अ उतारा (अनिवार्य)
 •         अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
 •         आधारकार्ड (अनिवार्य )
 •         ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
 •         अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 •         रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
 •         दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 •         बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
 •         रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
 •         दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
 •         बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 •         वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 •         शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 •         रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 •         प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी ची कार्यपद्धती काय आहे?

 •         अर्जदाराला सर्वप्रथम महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी लागेल.
 •         यानंतर दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
 •         मिळालेल्या अर्जामधून स्क्रुटीनी किंवा प्राथमिक निवड केली जाईल.
 •         निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करण्यात येतील.
 •         यानंतर अंतिम निवड केली जाईल.

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप अर्ज कुठे करावा ?

दुधाळ गाई म्हशी वाटप अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर म्हणजेच mahabms.com वर स्वीकारले जातात.

शासन निर्णय दुधाळ किंवा म्हशींचे गट वाटप योजना

राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी ६/४/२ दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय, सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत सदर योजनेस दिनांक ३० ऑक्टोबर २०१५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी ६/४/२ संकरित गाई किंवा म्हशींचे गट वाटप करणे या नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत दिनांक १९ जानेवारी २०१९ रोजी मंजुरी देण्यात आली.

या शासन निर्णयानुसार राज्यात दुग्धोत्पादनात चालना देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत वाटप करावयाच्या ६/४/२ संकरित गाई किंवा मशीनचे वाटप या योजनेमध्ये दुधाळ गाईंच्या यामध्ये गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी ,थारपारकर ,देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 

Leave a Comment