बजाज फायनान्स लोन माहिती  bajaj finance personal loan information

bajaj finance personal loan information: बजाज फायनान्स ही एक भारतीय वित्तीय कंपनी आहे. जी  लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग, आणि वैयक्तिक कर्ज म्हणजेच लोन देते. विमा, क्रेडिट कार्ड, म्युच्युअल फंड, तारण कर्ज, गुंतवणूक व्यवस्थापन ही त्यांची उत्पादने आहेत. आर्थिक सेवा व्यतिरिक्त ही कंपनी पवन ऊर्जा क्षेत्रात ही सक्रिय आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण बजाज फायनान्स लोन माहिती जाणून घेणार आहोत.

बजाज फायनान्स लोन माहिती

बजाज फिनसर्व मधून आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी लोन कर्ज शकतो. आणि हे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. हे कर्ज मिळवण्यासाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकतो आणि २४ तासांमध्ये आपल्याला हे कर्ज आपल्या बँकेमध्ये उपलब्ध होऊन जाते. आणि आपण हे कर्ज कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकतो.

बजाज फायनान्स चे फायदे (Advantages of Bajaj finance personal loan)

  • कर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर २४ तासाच्या आत आपल्या बँक अकाउंट मध्ये जितके आपण नमूद केले होते तितके कर्ज जमा होते.
  • २५ लाखापर्यंत आपण बजाज फायनान्स मधून कर्ज घेऊ शकतो.
  • आपण घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आपल्याला खूप दिवसांचा कालावधी भेटतो. एक वर्ष ते पाच वर्ष यामध्ये आपण हे कर्ज फेडू शकतो. म्हणजेच १२ महिने ते ६० महिने.
  • बजाज फायनान्स मधून कर्ज घेणे ही पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया आहे. ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे देण्याची गरज पडत नाही. आणि ही एक कागद विरहित प्रक्रिया आहे.
  • हे कर्ज घेताना कोणत्याही प्रकारचे छुपे चार्जेस लावले जात नाहीत. म्हणजेच फक्त पहिल्यांदाच जे काही चालले असतील ते द्यावे लागतात. नंतर आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत.
  • जर आपण बजाज फायनान्स च्या सर्व पात्रता पूर्ण करत असू तर आपल्याला फक्त पाच मिनिटांमध्ये सुद्धा मंजुरी मिळू शकते.

बजाज फायनान्स मधून कर्ज घेण्यासाठी पात्रता (Eligibility criteria)

  • बजाज फायनान्स मधून कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम आपण भारत देशाचे नागरिक असणे आवश्यक असते.
  • वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 21 वर्ष ते 67 वर्ष असायला हवे.
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कर्ज फक्त त्या लोकांना दिले जाते जे नोकरदार असतात. म्हणजेच एखाद्या खाजगी किंवा सरकारी कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तींनाच हे कर्ज दिले जाते. काही काही वेळा अर्जदाराचा पगार सुद्धा विचारात घेतला जातो.
  • बजाज फायनान्स मधून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी आपला सिबिल स्कोर ७५० च्यावर असावा लागतो.

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा (How to apply Bajaj finance personal loan)

  1. सर्वात प्रथम आपल्याला https://online-personal-loan.bajajfinserv.in/DGLogin या पेज वरती जावे लागेल. त्यानंतर Apply Online बटन वर क्लिक करावे लागेल.
  2. त्यानंतर त्याखाली दिलेली माहिती भरून ओटीपी टाकून व्हेरिफाय करावा.
  3. त्यानंतर आपल्याला केवायसी आणि उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल.
  4. त्यानंतर आपल्याला कर्जाची राशी निवडावी लागेल.
  5. त्यानंतर आपल्याला अर्ज सबमिट करायचा आहे.
  6. यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींकडून आपल्याला या संबंधित माहिती देण्यासाठी एक कॉल येईल. आणि त्यानंतर २४ तासाच्या आत तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवले जातील.

बजाज फायनान्स कार्ड माहिती (bajaj finance card information in marathi)

बजाज फिन्सर्व इएमआय कार्ड आपल्याला आपली खरेदी सुलभ हप्त्यानमध्ये रूपांतरित करून देते. ते आपल्याला चार लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करून देते. याचा वापर करून आपण घरगुती उपकरणे, गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, कपडे आणि अगदी किराणा सामान सुद्धा खरेदी करू शकतो.  या गोष्टी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी आपण एम आय स्टोअर वरील इएमआय नेटवर्क कार्ड सुद्धा वापरू शकतो. या बरोबरच नो कॉस्ट ईएमआय, शून्य डाऊन पेमेंट, आणि मोफत होम डिलिव्हरी यासारखे फायदे मिळवू शकतो.

बजाज फिन्सर्व इएमआय कार्ड पात्रता (bajaj finance card criteria in Marathi)

  • बजाज फिन्सर्व इएमआय नेटवर्क कार्ड ऑफलाइन किंवा इन्स्टा इएमआय कार्ड ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया जलद आणि सोपे आहे.
  • इएमआय नेटवर्क कार्ड ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • इन्स्टा इएमआय कार्ड ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय २३ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • हे कार्ड मिळवण्यासाठी आपल्याकडे उत्पन्नाचा कोणता तरी एक नियमित स्त्रोत असणे आवश्यक असते.

 

Leave a Comment