महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील गरीब नागरिकांच्या हितासाठी विविध सरकारी योजना सुरु करत असते.या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्या नागरिकांजवळ रहायला स्वतःचे घर नाही अशा नागरिकांना घराचे वाटप करण्यात येईल.
आपल्या देशात दारिद्रयरेषे खालील कुटुंबाची संख्या जास्त आहे त्यामुळे आपल्या राज्यात रहायला स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने रमाई आवास घरकुल योजनेची सुरुवात केली
Ramai Aawas Yojana : महाराष्ट्रातील ५१ लाख लोकांना या योजनेअंतर्गत घरे देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यापैकी १.५ लाख लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घरे देण्यात आले आहे ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील मोडणाऱ्या व्यक्तींना घेता येईल.
या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिक ज्यांच्या जवळ रहायला स्वतःचे घर नाही अशा नागरिकांना घरे उपलब्ध करुन देणे.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व नवबौद्ध या प्रवर्गातील नागरिकांना रहायला स्वतःचे घर उपलब्ध करून देणे व महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणे आहे.
या योजनेच्या मदतीने गरीब वर्गाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली.ज्या व्यक्तीला राहायला स्वतःचे घर नाही आणि त्यामुळे ते इकडे तिकडे भटकत असतात व रस्त्याच्या लगत झोपडी बांधून राहतात तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर असल्यामुळे स्वतःचे घर बांधण्यासाठी सक्षम नसतात आणि त्यांना स्वतःचं राहत घर नसल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिली जातात.
राज्यातील मागासवर्ग (अनुसूचित जाती, जमाती, बौद्ध ) यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून जे स्वतःचे घर विकत घेऊ शकत नाहीत आणि पडीक झोपडी मध्ये राहतात अशा लोकांना महाराष्ट्र सरकार रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देत आहे.
विशेष सूचना: आम्ही रमाई घरकुल योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी गरीब व्यक्ती असतील जे रमाई घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
आपण शासनाच्या विविध सरकारी योजना आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण रमाई घरकुल योजना काय आहे, उद्दिष्ट काय आहे, वैशिष्ट्य काय आहेत, फायदे काय आहेत पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे काय आहेत, अर्ज करायची पद्धत, रमाई घरकुल योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव | Ramai Aawas Yojana |
विभाग | ग्रामविकास व गृहनिर्माण विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध वर्ग तसेच गरीब कुटुंब |
योजनेचा उद्देश | गरिबांना घरे उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
रमाई घरकुल योजनेचा उद्देश्य
ज्या नागरिकांना रहायला स्वतःचे घर नाही अशा कुटुंबांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश्य आहे.
रमाई आवास घरकुल योजनेची वैशिष्ट्ये
- रमाई घरकुल योजना महाराष्ट्र सरकार द्वारा सुरु करण्यात आलेली एक गरिबांसाठी महत्वाची योजना आहे.
- या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींची घरे कच्ची आहेत अशा कुटुंबांना पक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची प्राधान्वय क्रमाने निवड करण्यात येते.
- सर्व साधारण क्षेत्रासाठी १३२०००/- रुपये अनुदान दिले जाते.
- शहरी भागासाठी घर बांधकामासाठी २५००००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- या योजनेअंतर्गत डोंगराळ भागासाठी १४२०००/- रुपये अनुदान दिले जाते.
- शौचालय बांधण्यासाठी या योजने अंतर्गत १२०००/- रुपयांची तरतूद केली गेली आहे.
- रमाई आवास घरकुल योजनेकरिता नरेगा अंतर्गत लाभार्थ्यास ९९ दिवसांचा रोजगार उपलब्ध केला जातो त्यासाठी लाभार्थ्यास १८०००/- रुपये दिले जातात.
- रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता अनुसूचित जातीं / अनुसूचित जमाती / बौद्ध जातीच्या प्रवर्गामधील जे अपंग लाभार्थी दारिद्र रेषेखालील नाहीत व ज्यांचे अपंगत्व ४०% पेक्षा अधिक आहे व त्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापर्यंत आहे, अशे अपंग लाभार्थी योजनेच्या इतर अटी पूर्ण करीत असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो.
- ज्या व्यक्तींना रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते घर बसल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- राज्यातील काही बेघरांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घेणे अशक्य होते त्यासाठी केंद्र शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून जागा खरेदीसाठी ५००००/- रुपये निधी उपलब्ध केला आहे जेणेकरून लाभार्थ्यास जागा घेऊन त्या जागेवर रमाई आवास घरकुल योजनेतील स्वतःचे घर बांधता येईल
रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी
- महाराष्ट्र राज्यात राहणारी आर्थिक दृष्ट्या कमजोर व्यक्ती ज्यांच्याजवळ रहायला स्वतःचे घर नाही अशी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- जी व्यक्ती गरीब असून स्वतःचे घर बांधायला समर्थ नाही अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत मदत करण्यात येते.
- रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तीं या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- पडीक झोपड्यांमध्ये राहणारे कुटुंब लाभ घेऊ शकतात
रमाई आवास योजनेअंतर्गत दिले जाणारे वित्तीय सहाय्य
- या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड ही सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 नुसार पारदर्शकपणे केली जाते.
- अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बौद्ध प्रवर्गातील ज्यांच्या स्वतःचे घर नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून यांच्या मार्फत मंजुरी देण्यात येते
- शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका यांच्या मार्फत मंजुरी देण्यात येते.
- लाभार्थी निवडीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बौद्ध प्रवर्गातील लाभार्त्यांना ३ टक्के घरकुल देणे बंधनकारक आहे.
- जमा झालेल्या अर्जांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
रमाबाई आवास घरकुल योजनेची कार्यपद्धती
- लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर लाभार्थी ज्या कच्चा व पडीक घरात राहतो त्या घराचे Geo Tagging केले जाते आणि अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले जाते व एक फोटो घेतला जातो.
- लाभार्थी जर ग्रामीण भागात राहत असेल तर अशा लाभार्थ्यांचे जॉब कार्ड मॅपिंग केले जाते.
- लाभार्थ्याचे बँक खाते PFMS प्रणालीकडे संलग्न केले जाते जेणेकरून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास मिळणारा निधी थेट त्याच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
- ग्रामपंचायत समिती लाभार्थ्याच्या नावाची यादी जिल्हास्तरावर मान्यतेसाठी प्रस्तवित करते.
- जिल्हा स्तरावरून मान्यता प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यास तालुका स्तरावरून पहिला हप्ता दिला जातो जो थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केला जातो.
- बांधकाम सुरू झाल्यावर जसे जसे बांधकाम पूर्ण होते तसे लाभार्थ्यास पुढील हप्ते दिले जातात.
बांधकाम सुरू झाल्यावर त्या बांधकामावर अधिकारी भेट देऊन त्यांच्यामार्फत कामावर देखरेख ठेवली जाते. आता नवीन बदलानुसार बांधकाम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यास गॅस शेगडी सुद्धा दिली जाते.
रमाई आवास घरकुल योजनेचे फायदे
- राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, गरीब वर्ग व मागासवर्गीय लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
- रमाई घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळेल.
- BPL कार्ड धारक कुटुंब या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतील.
- सर्व साधारण क्षेत्रासाठी घर बांधण्यासाठी १.३ लाख रुपये अनुदान दिले जाते.
- शहरी भागासाठी घर बांधकामासाठी २.५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- या योजनेअंतर्गत डोंगराळ भागासाठी १.४२ लाख रुपये अनुदान दिले जाते.
- शौचालय बांधण्यासाठी या योजनेअंतर्गत १२०००/- रुपयांची तरतूद केली गेली आहे.
- रमाई आवास घरकुल योजनेकरिता नरेगा अंतर्गत लाभार्थ्यास 90 दिवसांचा रोजगार उपलब्ध केला जातो त्यासाठी लाभार्थ्यास १८०००/- रुपये दिले जातात.
रमाई घरकुल योजनेसाठी आवश्यक पात्रता
अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
रमाबाई आवास घरकुल योजनेच्या अटी
- रमाबाई आवास घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना रमाई घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्ज करणारी व्यक्ती अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / बौद्ध प्रवर्गात मोडणारा असावा त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- रमाबाई आवास घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना रमाई घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्ज करणारी व्यक्ती अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / बौद्ध प्रवर्गात मोडणारा असावा त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- लाभार्थी ग्रामीण भागात राहत असल्या १ लाख २० हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न दाखला असणे आवश्यक
- लाभार्थी नगर परिषद क्षेत्रात राहत असल्यास त्याचे उत्पन्न १ लाख ५० हजार असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महानगर पालिका क्षेत्रात, मुंबई सारख्या क्षेत्रात राहत असल्यास २ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न दाखला असणे आवश्यक.
- लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्क्या स्वरूपाचे घर नसावे.
- अर्जदाराने या आधी कोणत्याही घरकुल / आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती जर सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
रमाई घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यास देण्यात येणारा प्राधान्यक्रम
- जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान झालेले (आगीमुळे किंवा इतर तोडफोडीमुळे घराचे नुकसान झालेले )
- ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार पीडित अनुसूचित जातीच्या पात्र व्यक्ती
- भूकंप / पुरात घराचे नुकसान झालेले कुटुंब
- घरात कुणीही कमावत नाही अशा विधवा महिला.
रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घराचे निर्धारित क्षेत्रफळ
- रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान ग्रामीण भागासाठी घराचे क्षेत्रफळ चटई क्षेत्र 269 चौ.फूट केले गेले आहे व शहरी भागासाठी घराचे क्षेत्रफळ 323 चौ.फूट केले गेले आहे. सदर जागा लाभार्थ्यांच्या मालकीची असल्यास त्याच्यावर अनुदान वापरून बांधकामासाठी अतिरिक्त लागणार खर्च लाभार्थ्यास देय राहील.
- रमाई घरकुल योजना अनुदान वितरण कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे.
- पहिला हफ्ता: घरकुलाचे ५० टक्के अनुदान घराचे बांधकाम सुरु करताना लाभार्थ्यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येते.
- दुसरा हफ्ता: ५० टक्के निधीचा उपयोग केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ४० टक्के अनुदान लाभार्थ्यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येते.
- तिसरा हफ्ता: घर पूर्ण झाल्यावर घराचा ताबा घेताना आणि सक्षम प्राधिकाऱ्यांनी घराचे काम पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर उर्वरित १० टक्के अनुदान लाभार्थ्यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येते.
वरीलप्रमाणे अनुदान गृह निर्माण समिती अध्यक्ष आणि सदस्य सचिव यांच्या स्वाक्षरीने विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या मदतीने दिले जाते.
माबाई आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- लाभार्थ्यांचे पॅन कार्ड
- लाभार्थ्यांचे मतदान कार्ड
- लाभार्थी ज्या जातीच्या प्रवर्गात मोडत असेल त्या जातीचे प्रमाणपत्र
- BPL प्रमाणपत्र
- जर लाभार्थी विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
- घर टॅक्स पावती
- असेसमेंट पावती
- लाभार्थ्यांचा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो.
- घर बांधायच्या जागेत सहहिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र.
- जन्म दाखला किंवा जन्मतारीख नमुद असलेला शाळेचा दाखला.
- या आधी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही याचे हमीपत्र.
- लाभार्थी पूरग्रस्त असल्यास त्याचा दाखला
- लाभार्थी पीडित असल्यास त्याचा दाखला
- लाभार्थ्याच्या कुटुंबाचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा १५ वर्षे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र.
- लाभार्थ्यांचे राशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक.
- १००/- रुपये स्टॅम्प पेपरवर टंकलिखित प्रतिज्ञापत्र.
- लाभार्थ्याचे बँकेत Joint Account असणे आवश्यक (नवरा बायको )
रमाई आवास घरकुल योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर https://pmayg.nic.in/netiay/home.aspx जावे.
- तुमच्या समोर जो होम पेज उघडला असेल त्यामध्ये तुम्हाला तुमची नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला रमाई घरकुल योजनेवर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती जसे की तुमचे नाव, लिंग, तुमची जन्मतारीख, ई-मेल इत्यादी भरायचे आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला लॉगिन वर क्लिक करायचे आहे.
- तुमचा Username आणि Password टाकल्यावर तुमच्यासमोर रमाबाई घरकुल आवास योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे तसेचे विचारलेली सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करायची आहेत आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुम्हाला रमाबाई आवास योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.