प्रधानमंत्री किसान निधी योजना 2022

प्रधानमंत्री किसान निधी योजना पात्रता निकष PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र सरकारने आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तुमच्या बँक खात्या मध्ये ही रक्कम जमा झाली की नाही, हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता.

PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकरी व गरीबांसाठी सरकारद्वारे अनेक विविध योजना राबण्यात आल्या आहेत. गरीब शेतकऱ्यांसाठी अशीच एक पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेंतर्गत गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये जमा केले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या योजनेचा ११वा हफ्ता जारी केला आहे. या योजनेंतर्गत १० कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळते.

शेतकरी योजना पेन्शन pm kisan निधी 6000

PM Kisan Samman Nidhi योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपये अशाप्रकारे वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. तुम्ही देखील या योजनेंतर्गत नोंदणी केली असेल व तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्यास तुम्ही सहज याबाबतची माहिती घेऊ शकता. पीएम किसान वेबसाइट आणि अ‍ॅपद्वारे तुम्ही घरबसल्या याबाबतची माहिती घेऊ शकता. याच्या प्रोसेसबाबत सविस्तर जाणून घेऊया.

PM Kisan App द्वारे चेक करा ११व्या हफ्त्याचे स्टेट्स

pmksy pradhanmantri kisan samman nidhi yojna eligibility यासाठी सर्वात प्रथम PM Kisan App फोनमध्ये डाउनलोड करा. यासाठी तुम्हाला पीएम किसानची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर क्लिक करावे लागेल.

आता उजव्या बाजूला देण्यात आलेल्या ‘डाउनलोड PMKISAN मोबाइल अ‍ॅप’ पर्यायावर क्लिक करा. तुम्ही थेट अँड्राइड फोनमध्ये Google Play store वरून देखील PM Kisan App ला डाउनलोड करू शकतो.

PM Kisan App चा वापर करून तुम्ही नोंदणी देखील करू शकता. तसेच, नोंदणी व रक्कमेच्या हफ्त्याबाबत देखील माहिती मिळेल. आधारवरील माहिती तपासू शकता. या योजनेबाबत सविस्तर माहिती देखील मिळेल. तसेच, योजनेबाबत व रक्कमेच्या हफ्त्याबाबत अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांकावर देखील कॉल करता येईल.

 farmers 6000 rupees per year scheme modi PM Kisan वेबसाइटद्वारे चेक करा ११व्या हफ्त्याचे स्टेट्स

  1. तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. आता होमपेजवर Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा.
  3. आता तुम्हाला आधार नंबर, बँक खाते आणि मोबाइल नंबर यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. इतर माहिती भरल्यानंतर ‘Get Data’व क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

 

 

 

Leave a Comment