जमिनीचा 7/12 Online कसा काढावा आपल्या मोबाइलवर फक्त 1 मिनिटात । नक्की पहा पूर्ण प्रोसेस

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्याला बरेच वेळा आपल्या सातबाराचे आपल्या जमिनीच्या सातबाराचे अर्जंटली काम पडते. आणि सातबारा आपल्याकडे नसतो. आता मी तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे, की तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर सातबारा कसा पहावा.

यामध्ये तुम्ही सर्वे नंबर, नाव, आडनाव इत्यादी माहिती वरून सातबारा पाहू शकता,यासाठी हा लेख पूर्ण वाचावा. हा सातबारा तुम्ही फक्त माहिती साठी पाहू शकता. इतर कामासाठी याचा उपयोग नाही.

Step 1: मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागणार किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हला तुमचा विभाग निवडायचा आहे. आणि Go या बटन वर क्लिक करायचं आहे.

Step 2: नंतर येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका, गाव, हे निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला येथे सर्वे नंबर टाकायचा आहे.

Step 3:  सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे  (यामध्ये तुम्ही सर्वे नंबर, नाव, आडनाव इत्यादी माहिती वरून सातबारा पाहू शकता ). आणि OK वर क्लिक करायचं आहे

Step 4: मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला येथे दिलेला कॅपच्या इंटर करायचा आहे. अक्षरी जशीच्या तशी त्यामध्ये बॉक्समध्ये टाकायची आहेत. आणि व्हेरिफाय सातबारा वर क्लिक करायचा आहे.

Step 5: यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा पूर्णपणे येथे दिसून जाईल.

Online सातबारा पाहण्या साठी येथे  क्लिक करा 

मित्रांनो होती एक छोटीशी पद्धत सातबारा पाहायची

Leave a Comment