वीज बील मोबाईलवर कसे पाहावे ? | How to download MSEDCL Electricity Bill (MAHAVITRAN) in 1 minute ?

MSEB ऑनलाइन बिल भरण्यापूर्वी, तुम्ही MAHADISCOM/MSEDCL/MAHAVITARAN वेब सेल्फ-सर्व्हिस पोर्टलच्या MSEB बिल व्ह्यू पेजचा वापर करून तुमचे महावितरण वीज बिल ऑनलाइन पाहू शकता. तुमची MSEB बिल प्रत मिळवण्यासाठी, तुम्हाला तुमचा MSEB 12 अंकी ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट (BU) माहित असले पाहिजे. तुम्हाला हे तपशील माहीत असल्यास, तुम्ही MSEB बिलाची सॉफ्ट कॉपी ऑनलाइन सहज मिळवू शकता.

नमस्कार मित्रांनो आता तुम्ही तुमचे वीज बिल आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता. आणि तसेच मागील एका वर्षाचे सर्व बिल आणि त्यासंबंधित पूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये घरबसल्या पाहू शकता. तर ते कसे आहेत ते या लेखामध्ये आपण पाहणार आहोत हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावा.

आपले इलेक्ट्रिक बिल कसे Download करावे

➤  सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलचा ब्राउजर वर जाऊन view bill असे टाईप करावे आणि जी पहिली वेबसाईट येणार त्या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल महाडिस्कॉम या वेबसाईटवर. किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता.

वेबसाईट लिंक

➤ यानंतर येथे तुम्हाला तुमचा कंज्यूमर टाईप Consumer Type तुमचा कंजूमर नंबर Consumer Number आणि बिलिंग युनिट Billing Unit टाकायचा आहे. (टीप: हे दोन्ही नंबर आपल्या जुन्या बिलावर किंव्हा आपल्या मीटर वर दिसून जातील ). हे तिन्ही गोष्टी टाकून झाल्यावर त्याच्या Captcha इंटर करू तुम्हाला सबमिट Submit बटन वर क्लिक करायचा आहे.

➤ सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या बिलाचे डिटेल येणार आणि तेथे  View या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

➤ क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे लाईट बिल ओपन होऊन जाईल हे बिल तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये प्रिंट आउट साठी सेव सुद्धा करू शकता.

 

मागील एका वर्षाचे सर्व बिल कसे काढावे

➤ सेम प्रोसेस करून आपल्याला आपला कंज्यूमर टाईप Consumer Type तुमचा कंजूमर नंबर Consumer Number आणि बिलिंग युनिट Billing Unit सबमित वर क्लिक करायचे आहे त्यानंतर ओपन होणाऱ्या ऑप्शन मध्ये View History यावर आपल्याला क्लिक करायचा आहे.

➤  हिस्ट्री वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मागील एका वर्षाच्या बिलाची यादी समोर येणार. यादी समोर असलेल्या  View या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मागील एका वर्षात सर्व बिल पाहू शकता किंवा डाऊनलोड करू शकता.

 

मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर या लेखाला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.

Leave a Comment