मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण नवीन GR आला योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे योजनेत झाले बदल शाशन निर्णय वाचा ladki bahini yojana new gr

 

ladki bahini yojana new gr “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेतील सुधारणाबाबत. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दि.२८.०६.२०२४ रोजीच्या मा.मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

 

माझी लाडकी बहीण नवीन
GR पहा  

 

त्यानुसार महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास शासन निर्णय दि.२८.०६.२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब, तसेच सदर जिल्हास्तर समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दि.०२.०७.२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. 

योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे सदर बैठकीमध्ये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेच्या दि. २८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशत: सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment