Mahadbt vihir anudan yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो महाडीबी पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना विविध योजना पुरवल्या जात असतात. त्यापैकीच एक योजना हे विहीर बांधण्यासाठी योजना त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.
Mahadbt vihir anudan yojana त्याच योजनेसाठी अर्ज पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत तर ते अर्ज कसे भरावे त्यासाठी काय लागते आणि त्यासाठी किती अनुदान मिळते हे आपण लेखांमध्ये पाहणार आहोत. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर जावे लागणार.
महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तुमचे प्रोफाईल आधी त्या वेबसाईटवर पूर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही कुठलीही योजनेसाठी अर्ज करू शकता. करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करू शकता.
विहीर अनुदान अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जसं की तुम्हाला माहित आहे महाडीबीटी पोर्टलवर कुठल्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधी महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यानंतर तुम्हाला नेट कॅफे किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन तुमचे प्रोफाईल योग्यरीत्या बनवणे आवश्यक असून त्याद्वारे तुम्ही तुमचे प्रोफाईल कंप्लिट झाल्यावर नवीन विहिरीसाठी अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक ऑनलाईन पेमेंट करावे लागणार ते पेमेंट सुद्धा तुम्ही आपले सरकार केंद्रावरही पेमेंट करू शकता. अशा रीतीने तुम्ही नवीन विहिरीसाठी अर्ज करू शकता.