गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली तलाठी पदाची भरती लवकरच होणार असून, सुमारे चार हजार पदे भरली जाणार आहेत. त्यानुसार या भरतीबाबतचे आदेश शासनस्तरावर निर्गमित करण्यात आले असून, महसूल विभागातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, या भरतीसाठी राज्यस्तरावर भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विभागीय स्तरावर महसूल उपायुक्त आणि जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील. talathi bharti documents
तलाठी भरतीसाठी हे कागदपत्र तयार ठेवा
येथे क्लिक करा
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील विविध शासकीय विभागांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे थेट सेवेद्वारे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारी बंधने होती. त्यात शिथिलता आली आहे. त्यामुळे विविध विभागातील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागांतर्गत 36 जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये नेमकी किती पदे रिक्त आहेत. याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार तलाठ्यांची पदे वाढण्याची शक्यता आहे. सध्या चार हजार पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. talathi bharti documents
महसूल विभागातील तलाठी पदाच्या भरतीसाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले राज्य, विभागीय आणि जिल्हा स्तरावरील नोडल अधिकारी (समन्वयक) सर्व स्तरावरील तलाठी पदाच्या रिक्त पदांची माहिती घेतील. तसेच, हा समन्वयक तलाठी संवर्गातील भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयातील तरतुदी आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार नमूद केलेल्या कंपन्यांची व्यवहार्यता तपासून परीक्षा आयोजित करण्यासाठी कंपनीची निवड करेल. नियोजित कार्यक्रमाचे नियोजन करून परीक्षेसाठी निवडलेल्या कंपनीसोबत नेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षेद्वारे ही भरती घेतली जाईल. talathi bharti documents