नमस्कार मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या दोन महिन्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील 10 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना प्रचलित दर दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत दुपटीने मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
आणि लवकरच ही रक्कम या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला किती रक्कम मिळेल व कधी मिळेल. मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी व पुरु यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते तर या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत दुपटीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
त्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागातील म्हणजेच एकूण दहा जिल्ह्यातील बाराशे 86 कोटी 74 लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे लाखो बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि हे 10 जिल्हे कोणकोणती असणार आहेत पहा औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड ने विभागातील पुणे सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.
मित्रांनो या शासन निर्णयानुसार जिरायत पिकांच्या नुकसानी भरपाई पोटी पूर्वी प्रती हेक्टर सहा हजार आठशे रुपये दोन हेक्टरची मर्यादा होती आणि ती आता 13600 प्रति हेक्टर करून तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवली आहे त्याच्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टर 13500 वरून 27 हजार रुपये केले आहे तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 18 हजार रुपयांवरून 36 हजार रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो ही मदत राज्य शासनाने घोषित केलेले अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीसाठी लागू असेल.
अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असल्यास आणि मंडळांमधील गावात 33% पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत अनुज्ञ असणार आहे लाभार्थींना नुकसान भरपाई पोटीची रक्कम थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित करण्यात येईल तसेच शेतकरी लाभार्थींना मदत वाटप केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे