तलाठी भरती जागा 2022 – 3110 पदे रिक्त | Talathi Bharti Vacancy 2022 – 3110

तलाठी भरती 2022 संपूर्ण माहिती

नमस्ते मित्रांनो आज आपण या लेखात तलाठी भरती 2022 याबद्दल पूर्ण माहिती पाहणार  आहो. या मध्ये आपण माहिती खालील बुलेट्स च्या माध्यमाने पाहणार आहो.

तलाठी या पदा करिता एकूण किती जागा रिक्त आहेत?

मित्रांनो तलाठी या पदा करिता आखरीची भरती झाली होती. ते 2019 साला मध्ये झाली होती. आणि  त्या नंतर आता 2022 या चालू वर्षां मध्ये तलाठी करिता भरती होणार आहे. आणि काही विद्यार्थ्यां च्या माहिती अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आपल्याला माहिती मिळाली आहे. की या पदा करिता संपूर्ण 3110 जागा रिक्त आहेत.

तलाठी पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या

आपल्या सर्वांना माहित असणार कि तलाठी हे पद महसूल विभागा च्या अंतर्गत येते. तलाठी या पदावरील व्यक्तीला दिलेल्या गावा मधील तसेच अनेक गाव मिळून तयार झालेल्या सांज्यात काम करावे लागते.

ज्या गावा मध्ये तलाठ्यांची नोकरी असते तिथेच त्यांचे ऑफिस सुद्धा असते. तलाठी यांना शेतिकची, फळबागांची, दुष्काळग्रस्त शेटची वेळोवेळी पाहणी करावी लागते. तसेच तलाठी पदावर असणाऱ्या व्यक्तीणा तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना आपल्या कामाचा अहवाल सादर करावा लागत असतो.

परीक्षा कोणती द्यावी लागणार ?

तलाठी पद मिळवायचे असणार तर तुम्हाला सरळसेवा भरतीची परीक्षा द्यावी लागते. आणि ही परीक्षा सर्व 2 – 3 वर्षा मधून येकादाच निघते. आणि त्या मुळे सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षे करिता नेहमी आपल्या अभ्यास सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता काय असणार?

या पदा करिता कोणत्या पण शाखेचा पदवीधर पात्र असतो. तसेच तो व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. त्या व्यक्ती ला मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. जर तुम्ही मुक्त विद्यापीठ मधून पदवी प्राप्त केली असेल. आणि तरी सुद्धा तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात. या सोबतच तुम्ही संगणकाची MS-CIT ही परीक्षा सुद्धा पास असणे गरजेचे आहे. परंतु तुम्ही तलाठी या पदावर जॉईन झाल्या च्या 2 वर्ष तुम्हाला MS -CIT ही परीक्षा पास होण्यासाठी सूट दिली जाते.

वयोमर्यादा

1) खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे

2) मागासवर्गीय प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे

3) खेळाडू – 18 ते 43 वर्षे

4) प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अपंग – 18 ते 45 वर्षे

5) माजी सैनिक 18 ते 45 वर्षे

परीक्षे च्या अभ्यासा चे काय स्वरूप असणार?

तलाठी परीक्षे करिता एकूण 4 विषय असतात. आणि प्रतेक विषय हा 25 प्रश्नांचा असतो. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असता म्हणजेच संपूर्ण पेपर 100 प्रश्न आणि 200 गुणांना असतो. खालील विषय असतात.

1) मराठी

2) इंग्रजी

3) सामान्य ज्ञान

4) अंकगणित व बुद्धिमत्ता

प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम?

1) मराठी   –  समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दाचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधींचे प्रकार म्हणी, वाक्यप्रचारचे अर्थ व उपयोग, इत्यादी.

2) इंग्रजी – vocabulary: synonyms, antonyms, proverb, one word substitution, spelling, and kind of tense, spot the error, sentence structure, use proper form of verb, question tag, comprehension passage, etc.

3) सामान्य ज्ञान – महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाज सुधारक, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, महाराष्ट्रात व भारताचा भूगोल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इत्यादी.

4) अंकगणित व बुद्धिमत्ता – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिणामी, घड्याळ, अंकमालिका, अक्षर मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध-अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती, इत्यादी.

परीक्षा पद्धती online की offline ?

परीक्षा ही संगणक प्रणाली प्रमाणे केवळ online पद्धतीनेच होते तसेच या परीक्षे साठी कोणत्याही प्रकारची नकारात्मक गुणांक पद्धती नसते.

कागदपत्रे

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. 10वी, 12वी, पदवी गुणपत्रिका
  3. चारित्र्य प्रमाणपत्र
  4. अधिवास प्रमाणपत्र
  5. जातीचा दाखला आणि नॉन क्रिमी लेयर
  6. जात वैधता प्रमाणपत्र
  7. आरोग्य प्रमाणपत्र

 

Leave a Comment