यास अनुसरुन पुरवणी मागणीन्वये व सुधारित अंदाजान्वये मंजूर निधीपैकी कृषीपंप, यंत्रमाग व वस्त्रोद्योग ग्राहकांना वीज सवलतीसाठी अनुक्रमे रु.१७७७.०० कोटी, रु.१८०.८२ कोटी व रु.७३.३३ कोटी रक्कम समायोजनाने महावितरण कंपनीला वितरीत करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिलेली आहे. त्यानुसार एकूण रु.२०३१.१५ कोटी रक्कम समायोजनाने महावितरण कंपनीला वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.