यांना मिळणार नवीन विहीन बांधणी साठी 2.5 लाख आणि जुनी विहीर दुरुती साठी 50 हजार अनुदान अर्ज झाले सुरु mahadbt vihir yojana

 

mahadbt vihir yojana आयुक्तालयाने नवीन विहीर घेणाऱ्या लाभार्थ्यास, विहिरीसाठी रु. २ लाख विद्युतपंपासाठी रु.२५,०००; वीज जोडणीसाठी रु.१०,००० व ठिबक सिंचन संचासाठी रु.५०,००० / स्प्रिंकलर सिंचन संचासाठी रु.२५,००० याप्रमाणे रु.२,८५,०००/रु.२,६०,००० एवढ्या रकमेचे पॅकेज देण्याची शिफारस केली.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

 

विहीर अनुदान 2024 सदर योजनेंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण अवजारे / शेतीची सुधारीत अवजारे, बैलगाडी, वैलजोडी/ रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाईपलाईन, पंपसेट, नवीन विहीर इत्यादी बाबी विहित मर्यादेत १००% अनुदानावर अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांना पुरविण्यात येत होत्या. विहीर अनुदान योजना

 

पंचायत समिती विहीर योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष घटक योजना सन १९८२-८३ पासुन राबविण्यात येत आहे. vihir anudan yojana सदर योजना दिर्घ कालावधीपासून राबविण्यात येत असल्याने, योजनेचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय विभागाने घेतला. त्यासाठी विभागीय कृपी सहसंचालक, नागपूर यांचे अध्यक्षतेखाली, दि. २४ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने दि. १९ एप्रिल, २०१६ रोजी अहवाल सादर केला. कृपी आयुक्तालयाने दि. २७ एप्रिल, २०१६ च्या पत्रान्वये आयुक्तालयाच्या शिफारशीसह अहवाल शासनास सादर केला. vihir yojana maharashtra

 

vihir anudan yojana maharashtra 2022 मा.मंत्री (वित्त) यांनी सन २०१६-१७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना” या नवीन योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी विहीर खोदण्याकरीता रु.२ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. विहीर अनुदान योजना कागदपत्रे तसेच विहिरीवर विद्युत पंप बसविणे आणि जेथे ग्रीडमधून वीज पुरवठा करणे शक्य नसेल तेथे सौर उर्जेतून वीज जोडणी देण्यात येईल. या माध्यमातून त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढविण्यात मदत होईल” अशी घोषणा केली. vihir anudan yojana maharashtra 2023

dr babasaheb ambedkar krushi swavlamban yojana प्रचलीत विशेष घटक योजनेमध्ये विहीर, विद्युत पंप या घटकांचा समावेश आहे. त्यामध्ये विहीरीसाठी अनुदानाची मर्यादा रु.१ लाख एवढी आहे. योजनेचे पूनर्विलोकन करण्यासाठी नियुक्त समितीने केलेल्या शिफारशीमध्ये, विहिरीसाठी अनुदानाची मर्यादा रु.१ लाख वरुन रु.२ लाख एवढी करण्याची शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे, आयुक्तालयाने नवीन विहीर घेणाऱ्या लाभार्थ्यास, विहिरीसाठी रु. २ लाख विद्युतपंपासाठी रु.२५,०००; वीज जोडणीसाठी रु.१०,००० व ठिबक सिंचन संचासाठी रु.५०,००० / स्प्रिंकलर सिंचन संचासाठी रु.२५,००० याप्रमाणे रु.२,८५,०००/रु.२,६०,००० एवढ्या रकमेचे पॅकेज देण्याची शिफारस केली. विहीर अनुदान योजना 2024

Maharashtra shetkari yojana अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांसाठी विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये मा. मंत्री (वित्त) यांनी सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोपित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृपी स्वावलंबन या नवीन योजनेत विहीर, विद्युत पंप या घटकांचाही समावेश आहे. यास्तव, अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांसाठी प्रचलित असलेली विशेष घटक योजना व मा. मंत्री (वित्त) यांनी घोपित केलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृपी स्वालंबन योजना, या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता, बदलेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून (moisture security) सध्याची प्रचलित विशेप घटक योजना, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृपी स्वावलंबन योजना” या नावाने या शासन निर्णयातील नमूद घटकांसाठीच राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

 

शासन निर्णय: डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृपी स्वावलंबन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत खालील घटकांसाठी त्यापुढे नमूद रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल.

सदर योजनेतील नवीन विहीर व त्यासोबतच्या घटकांची (पंपसंच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच), (नविन विहीर घटकासाठी या वर्षात या पूर्वी निवड़ झालेल्या लाभार्थ्यांसह) अंमलबजावणी सन २०१६-१७ या वर्षात करण्यात येईल. how to apply dr babasaheb ambedkar krushi swavlamban yojana सदर योजनेतील वरिल घटकांपैकी उर्वरीत सर्व घटकांसह अंमलबजावणी सन २०१७- १८ या वर्षापासून करण्यात येईल.

प्रचलित विशेष घटक योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना, उर्वरीत सर्व घटकांसाठी (नवीन विहीर, त्यासोबतचे पंपसंच, व सूक्ष्म सिंचन संच वगळून) सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या दरानेच व विहीत मर्यादेत अनुदान देण्यात येईल. सदर योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान, प्रधान मंत्री कृपी सिंचन योजनेंतर्गत अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानास पुरक अनुदान म्हणून देण्यात येईल.

सूक्ष्म सिंचन संचाच्या अनुदानाचे सूत्र व कार्यप्रणाली ठरविणे करीता मंत्री मंडळाची उप समिती गठीत करण्यात येत आहे. या उप समितीच्या निर्णयाप्रमाणे अनुदानाची रक्कम व कार्यप्रणाली लागू राहील.

नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास, विहिरीसोबतच पंप संच, वीज जोडणी आकार असे एकत्रित रु.२.८५ लक्ष/२.६० लक्ष च्या मर्यादेत व परिच्छेद ७ मध्ये नमूद उप समितीने निश्चित केलेल्या सूत्रांनुसार सूक्ष्म सिंचनासाठी अनुज्ञेय अनुदान, असे एकत्रित पॅकेज देण्यात येईल.

जूनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास, विहिर दुरुस्तीसोबतच पंप संच, वीज जोडणी आकार असे एकत्रित रु.८५,०००/६०,००० च्या मर्यादेत व परिच्छेद ७ मध्ये नमूद उप समितीने निश्चित केलेल्या सूत्रांनुसार सूक्ष्म सिंचनासाठी अनुज्ञेय अनुदान, असे एकत्रित पॅकेज देण्यात येईल.

ज्या शेतकऱ्यास ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “मागेल त्याला शेततळे” योजनेमध्ये शेततळे मंजूर झाले असेल अशा शेतकऱ्यास, शेततळ्याचे अस्तरीकरण, वीजपंप, वीज जोडणी आकार असे एकत्रित रु.८५,०००/रु.६०,००० च्या मर्यादेत व परिच्छेद ७ मध्ये नमूद उप समितीने निश्चित केलेल्या सूत्रांनुसार सूक्ष्म सिंचनासाठी अनुज्ञेय अनुदान, असे एकत्रित पॅकेज देण्यात येईल .

प्लॅस्टीक अस्तरीकरणासाठीच्या खर्चाची परिगणना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ३०० मायक्रॉनच्या प्लॅस्टीकसाठी रु.९५ प्रति चौ.मि. या दराने करण्यात येईल व प्रत्यक्ष खर्चाएवढे कमाल रु.१,००,००० च्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल.

ज्या शेतकऱ्यांनी यापुर्वीच शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यास पंपसंच, वीज जोडणी असे एकत्रित रु.८५,०००/रु.६०,००० च्या मर्यादेत व परिच्छेद ७ मध्ये नमूद उप समितीने निश्चित केलेल्या सूत्रांनुसार सूक्ष्म सिंचनासाठी अनुज्ञेय अनुदान, असे एकत्रित पॅकेज देण्यात येईल.

लाभार्थ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीज जोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रु.३५,०००) लाभार्थी हिश्श्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करण्यात येईल.

लाभार्थ्याकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ विहित मर्यादेत देण्यात येईल. सदर योजनेंतर्गत ७०% अनुदानाचा लाभ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देण्यात येईल.

नवीन विहिर, जूनी विहिर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याने ईनवेल बोअरिंगची मागणी केल्यास सदर शेतकऱ्यास नवीन विहीर व त्यासोबतच्या एकत्रित पॅकेजसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त रु.२०,०००/- इतके अतिरिक्त अनुदान देण्यात येईल.

सदर योजनेंतर्गत सन २०१७ या वर्षात (जानेवारी-२०१७ ते डिसेंबर-२०१७) २५,००० विहिरींचे उद्दिष्ट पुर्ण करण्यात येईल. सन २०१७ या वर्षातील २५,००० विहिरींच्या उद्दीष्टांपैकी १०,००० विहिरींचे उद्दिष्ट जानेवारी-२०१७ ते मार्च-२०१७ या कालावधीत पूर्ण करण्यात येईल. उर्वरीत १५,००० विहिरींचे उद्दिष्ट एप्रिल-२०१७ ते डिसेंबर-२०१७ या कालावधीत पूर्ण करण्यात येईल. लाभार्थ्याला देय अनुदानाची रक्कम त्याच्या बँक खात्यावर आरटीजीएस द्वारे जमा करण्यात येईल.

Leave a Comment