Ladki Bahin Yojana एक स्त्री कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचा व्यवस्थापन आणि अर्थाजन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खरी कुटुंब सांभाळणाऱ्या, कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमत हो पाहतो आहे.
अशा आपल्या कर्तृत्वात माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांशी आणि व्यापक योजना आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व घोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील.
या योजने साठी दरवर्षी 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. आपल्या शासनाने सर सन 2023 24 पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे. मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येत. दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक देखील करण्यात आलेला आहे.