अटी शर्ती देण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू राहणार आहे. एक मुलगा एक मुलगी असल्यास ही योजना त्या मुलीला लागू राहील पहिल्या अपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.
लेक लाडकी योजनेचा अधिकृत
शासन निर्णय पहा
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर जुळी आपत्य जन्माला आले ज्याच्यामध्ये एक मुलगी किंवा दोन मुले असतील तर त्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील त्यानंतर मात्र माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा असेल आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुली जर जन्माला आले तर जुळ्या मुलीला ही योजना अनुदेय राहणार आहे मात्र याच्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.