Nuksan Bharpai Maharashtra 2022 | नुकसान भरपाईसाठी 3600 कोटी शासन निर्णय

जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत ativrushti nuksan bharpai maharashtra

प्रस्तावना :

Nuksan bharpai maharashtra 2022 अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. राज्यात जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्हयात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.१०.०८.२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

शासन निर्णय : संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ativrushti nuksan bharpai 2022

२. तसेच, जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीकरिता शेतीपिकांच्या नुकसानीव्यतिरिक्त इतर बाबीकरीता संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार मदतीचे वाढीव दर लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. nuksan bharpai list

३. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यक्तीरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावी. ativrushti nuksan bharpai list 2022

४. मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेतीपिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे. ativrushti nuksan bharpai yadi 

५. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच यासाठी निधी वितरीत केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी. सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. तसेच लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या ndmis.mha.gov.in या संकेतस्थळावरील प्रणालीमध्ये भरण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी. nuksan bharpai yadi

Leave a Comment